Type Here to Get Search Results !

चिल्ली नांदगव्हाण घाटात भीषण अपघात ,प्रवाशी सुखरूप

उमरखेड प्रतिनिधी
आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नागपूर तुळजापूर महामार्गावर अर्धवट असलेल्या रस्त्याच्या कामामुळे बंद पडलेल्या ट्रकला बाजू देऊन अतिशय संथ गतीने घाटातून गाडी उतरत असताना महामार्गाची उर्वरित काम करणाऱ्या कंपनीच्या मिक्सरने वेगात येऊन मागच्या बाजूने गाडीला धडक दिली .यावेळी एम एच 20 बी एल 2607 या बसचा चिल्ली नांदगव्हाण घाटात भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेवर असलेल्या पुलाच्या कठड्यावर गाडी अडकल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले.
या बस मध्ये एकूण 31 प्रवासी व चालक एस .एम. मस्के व वाहक एल .एच .गायकवाड होते. चालकाच्या सावधानतेमुळे दरीत कोसळणारी बस पुलाच्या कठड्याला अडकली व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
नागपूर तुळजापूर महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून बंद होते. त्यात सहा महिन्यापासून कामाला सुरुवात झाली असून कुठलाही एक रस्ता पूर्ण न करता जागोजागी तुकड्याने काम करण्याचा कार्यक्रम चालू असून या काम करण्याच्या पद्धतीमुळे घाटात रोजच अपघात व ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत असून याकडे प्रशासनाचे लक्ष नसून विशेषता याच विभागामध्ये वसुली करणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित नसतात यावर प्रवाशांनी अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन घाटातील रस्ता पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.