Type Here to Get Search Results !

शिंदोला गावामध्ये शेतकरी वर्गांनी मतदानाकडे फिरवली पाठ

मजूर वर्गाकडून मतदान 
गणेश रांगणकर :लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे आवाहन शिंदोला येथील ग्रामस्थांनी केले होते . निवडणुकीवर बहिष्कार असल्याचे निवेदन हि देण्यात आले.तो त्यांचा मूलभूत अधिकार होता.सर्व शेतकरी व गावकरी आपल्या हक्कासाठी शासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून मागणी करीत होते .काहीनी महसूल मंत्राच्या दालनातही शेतीबाबत विषय धरून लावला .मात्र अद्याप माहूर देवस्थान व येथील शेतकरी असा लढा सुरु आहे .पिढ्यान न पिढ्या शेती वहिती करीत असताना साधे कुळ म्हणून हि शेतकऱ्याची नावे सातबारा मध्ये नोंद नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज हि मिळत नव्हते .त्यामुळे या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे .परंतु शासनाने अद्याप शेतकऱ्याचे निराकरण केले नाही .शासनाने लक्ष घालावे म्हणून गावकर्यांनी एकमताने ग्रामपंचायत निवडणुकीवर तसेच यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणूकी मध्ये सहभाग न घेता  बहिष्कार राहील असा निर्णय घेतला आहे .
आजपर्यंत झालेल्या निवडणुकीवरती शंभर टक्के गावकर्यांनी बहिष्कार नोंदविला .मात्र काही नेते मंडळींना ते पचेनासे झाले . स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थाकरिता  लोकसभा निवडणुकीमध्ये  सहभाग नोंदविला अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये  आहे .शिंदोला गावाची मतदार संख्या  स्त्री _पुरुष मिळून 1505 एवढी आहे मात्र लोकसभेसाठी मतदान 295 इतके झाले आहे .यावरून गावकर्यांचा बहिष्कार कायम असल्याचे बोलले जात आहे .तर मतदान करणाऱ्यांमध्ये मजूर वर्ग आहे असेही बोलल्या जात आहे .त्याच गावातील शेकडो ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बहिष्कार मोडीत  काढावा  अशी मागणी केली .मात्र त्या निवेदनाचा  असा फारसा  असर झालेला  दिसून येत नाही .पुढील होणाऱ्या निवडणुका वरती असाच बहिष्कार राहील का ?  प्रशासन काही निर्णय घेईल  का याकडे तालुक्याचे  लक्ष लागले आहे .

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. There must be unity in the citizen.. of the village...

    ReplyDelete