Type Here to Get Search Results !

वणी मध्ये स्टॅम्प चा तुटवडा ,शेतकरी हैराण

गणेश रांगणकार वणी:या आठवड्यात वणी तहसील कार्यालयात शंभर रुपयाचे मुद्रांक मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह अनेक नागरिक अडचणीत सापडले आहे .मुद्रांक उपल्बध नसल्याने अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे .मुद्रांक विक्रेत्यांशी संपर्क केला असता परवाना नूतनीकरण न झाल्याने स्टॅम्प कोषागार विभागातून मंजुरी ची प्रक्रिया होत नाही असे सांगण्यात आले .
तहसील कार्यलयात मुद्रांक विक्रेते स्टॅम्प विक्रीचा व्यवसाय करीत असतात .शासनाने पाचशे रुपयाचे वरती असणाऱ्या स्टॅम्प ची विक्री बंद केली आहे .खरेदी -विक्री करीता ऑनलाईन स्टॅम्प काढले जात आहे .मात्र किरकोळ कामाकरिता आजही शंभर चे स्टॅम्प वरती व्यवहार केले जात आहे .करारपत्र , इसारपत्र,वाहनांची सौदाचिठी  असो किंवा  लहान मोठे व्यवहार शंभर च्या स्टॅम्प वरतीच  व्यवहार उरकविले  जातात  .शेतकऱ्यांना पीक कर्जाकरिता  सुद्धा घोषणापत्र  व इतर कार्यालयीन  कामाकरिता 100 च्या स्टॅम्पची  मागणी केली जाते .

वणी तालुका हा लोकसंख्येने  मोठा आहे .वणी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर दररोज व्यवहार होत असतात .मात्र तालुक्यात दोनच स्टॅम्प विक्रेते असल्याने दोन्ही स्टॅम्प विक्रेत्याकडे  दररोज गर्दी असते .एकीकडे शासनाने ऑनलाईन स्टॅम्प विक्री असताना सुद्धा वणी तालुक्यात 100  स्टॅम्प ची मागणी आहे .मात्र या आठवड्यात  शंभर चे  स्टॅम्प मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची  स्टॅम्प साठी तारांबळ  उडाली आहे .शेतकऱ्यांसाठी हा महिना खूप महत्वाचा  आहे अनेक शेतकरी या महिन्यातच  पीक कर्ज नूतनीकरण प्रक्रिया पार पडत असते .सोबतच नवीन शेतकरी सुध्दा बँकेकडे  पीक कर्ज मागणी अर्ज सादर करतात  .त्यावेळी बँकेकडून  शंभर चे स्टॅम्प मागविले  जाते .मात्र वणी तालुक्यात स्टॅम्प मिळत नसल्याने काही शेतकरी मारेगाव ,झरी जामणी  या तालुक्यातून  स्टॅम्प खरेदी  करीत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.