Type Here to Get Search Results !

"अघम "यांना आदर्श तलाठी पुरस्कार

1मे महाराष्ट्र दिनी पालक मंत्री संजय राठोड यांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले

गणेश रांगणकर वणी:महसूल विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल तलाठी सुमेध अघम यांना नुकताच अमरावती विभागाचा ''आदर्श तलाठी'' पुरस्कार प्रदान करण्यात आला. वणी तालुक्यास अनेक वर्षानंतर हा मान मिळाला आहे. लोकप्रिय तलाठी म्हणून त्याची ख्याती आहे .त्यामुळे त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
अघम हे सध्या गणेशपूर ,नांदेपेरा (ता. वणी) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी 
साखरा ,गोडगाव , इजासन,वांजरी ,मजरा या गावांमध्ये शेतकरीभिमुख कामाचा ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न करता उलट कार्यालयात अधिकाधिक वेळ देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम शंभर टक्के सातबारा संगणकीकरण करण्याची कामगिरी त्यांनी केली होती. याशिवाय मागील सलग दोन वर्ष नांदेपेरा गावात महापूर आले. या काळात पुरात अडकलेल्यांची सुटका, शेती व घरांचे पंचनामे, कोविडकाळातील कामगिरी याबाबतीत उत्कृष्ट काम केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील तलाठ्यांमधून एकमेव अघम यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवड झाली.
अमरावती विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय ,जिल्हाधिकारी यवतमाळ  पंकज आशिया यांचे उपस्थितीमध्ये  पुरस्कार देण्यात आला .वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले ,तहसीलदार  निखिल धूळधर यांनीही अघम यांचे कौतुक केले. गणेशपूर येथील सरपंच आशाताई जुनघरी ,नांदेपेरा येथील सरपंच विलास चिकटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.