Type Here to Get Search Results !

दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले

दुचाकी चोरटे पोलिसांच्या  जाळ्यात 

वणी :दिवसेंदिवस चोऱ्यांचे घटना मध्ये वाढ होत आहे दिनांक ०८/०१/२०२४ रोजी नामे आशिष अशोक देठे वय २७ वर्ष रा. जैन ले आउट वणी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची एक काळया रंगाची पॅशन प्रो मोटार सायकल क. MH 29-AF-8378 नंदीनी बार चे समोरून चोरीस गेली होती त्याबाबत गुन्हा नोंदविला होता. मा. पोलीस निरीक्षक साहेब यांना मिळालेल्या खबरेवरून पोउपनि झाडोकार व डि.बी पथक कर्मचारी हे भद्रावती येथे रवाना होवुन आरोपी नामे पुनमचंद बंडु पोहीनकर वय २४ वर्ष रा. नांदा बीबी ता. कोरपना जि. चंद्रपुर व गोलु संजय वरवाडे वय २१ वर्ष रा. भद्रावती जि. चंद्रपुर येथुन दोन्ही आरोपी व गुन्हयात चोरी गेलेली मोटर सायकल क.MH 29-AF-8378 जप्त करण्यात आली.तसेच दिनांक १६/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे गणेश शामराव ठुमणे रा. लक्षमीनगर वणी यांची हीरो स्प्लेडर गाडी क्रमांक MH 29-X-4688 ही लक्षमीनगर वणी येथुन चोरीस गेली होती वरून पो.स्टे ला अप क्रमांक १००७/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा तपासावर होता. त्यावरून मा. पोलीस निरीक्षक सा यांना माहीती मिळाली की, एक ईसम चोरी ची मोटर सायकल वणी बस स्टॉप समोर एक ईसमाला विक्री करणार आहे अशी गोपनिय मोहीती वरून मा. पोलीस निरीक्षक सा यांचे आदेशाने पोहवा विकास धडसे व त्यांचे पथक यांनी सापळा रचुन आरोपी प्रफुल रमेश वय २५ वर्ष रा. गुढगाव ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन दोन विना नंबर प्लेट मोटर सायकल व हीरो स्लेडर गाडी कमांक MH 29-X-4688 जप्त करून ताब्यात घेतली.पावेतो वरील प्रमाणे एकुन ०४ मोटार सायकल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आरोपीचा पोलीस कस्टडी घेवुन वणी तसेच आजु बाजु परीसरातील चोरीस गेलेल्या मोटर सायकल बाबत शोध सुरू असुन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदरची कार्यवाही मा.डॉ. पबन बन्सोड सा पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप सा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे सा. उप.वि.पो.अ. वणी, पोलीस निरिक्षक/अनिल बेहेरानी सा ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात पोउपनि बलराम झाडोकार, सफौ / सुदर्शन वानोळे, पोहवा/विकास धडसे, पोना/पंकज उंबरकर, पोकों/विशाल गेडाम, पोकों/मो. वसीम, पोकॉ. श्याम राठोड, पोकॉ सागर सिडाम, पोकों शुभम सोनुले व पो.कॉ. गजानन कुडमेथे यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.