Type Here to Get Search Results !

तालुक्यात आत्महत्येचा आलेख चढत्या क्रमाने ,कमी होण्याऐवजी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ


गणेश रांगणकर :,वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बेलोरा गावात इलेक्ट्रिक कामे करणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली. गावातील मुख्य चौकात असलेल्या हायमास्ट लाईटच्या खांबवर दोरीच्या सहाय्यने फास टाकून त्यांने आत्महत्या केली. स्वप्नील सुधाकर भोंगळे (28) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक हा बेलोरा गावात आपल्या आईसह राहता होता. गावात खाजगी इलेक्ट्रिकचे कामे करून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. रविवारी पहाटेच्या दरम्यान त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या हायमास्ट लाईटच्या पोलवर चढून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 6 वाजता गावातील काही नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लगेच शिरपूर पोलीस ठाण्यात सूचना दिली.

शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला तसेच मृतदेह खाली उतरवून शव विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृतक स्वप्नील याला वडील नसून तो आपल्या आई व भावासोबत राहत होता. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे गावात शोकांकूल वातावरण झाले  आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.