Type Here to Get Search Results !

▪️ *चिमुकल्यांनी ठेवला पहिला रोजा *


▪️ *11 मार्च पासून रमजान मास आरंभ*


गणेश￰ रांगणकर वणी:

इस्लाम  धर्माच्या पाच मुख्य - कर्तव्यामध्ये रोजा (उपवास) यास मोठे महत्व प्राप्त आहे. पवित्र कुराणमध्ये तुमच्या अंगी ईश परायणता यावी व तुमच्या जवळपास असलेल्या रंजल्या गाजल्यांवर येत असलेल्या उपासमारीची तुम्हाला जाण व्हावी या उद्देशाने तुमच्या वर रोजे फर्ज (कर्तव्य) करण्यात आल्याचे उल्लेख आहे. म्हणून प्रत्येक मुस्लिम धर्मीयांना - रोजे ठेवणे अनिवार्य असते.

        प्रत्येकाच्या जीवनातील पहिला रोजा हे एक अविस्मरणीय भाग असतो. उपवासाचा प्रथम दिवस जणू एखाद्या घरगुती कार्यक्रमा प्रमाणे साजरा केला जातो व आयुष्यभर स्मरणात सुद्धा राहतो.वणी येथिल काळे ले आऊट नगर मधील मो. अली मोहम्मद इक्बाल शेख या नऊ वर्षांच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला  रोजा पुर्ण केला. याबद्दल अली चे मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले.

इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.

मो. अली मोहम्मद इक्बाल शेख  याने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो सकाळी पाच वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अली ला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला.


 मो.अली हा पत्रकार इक्बाल शेख यांचा मुलगा आहे.मो. अली मोहम्मद इक्बाल शेख  नऊ वर्षीय बालकाने    सोमवार 11 मार्च रोजी पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केला. उन्हाळ्याच्या दिवसात लहानश्या वयात रोजा केल्याने त्याचे  कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.